मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (MMR) मधील लाखो रेल्वे प्रवाशांचा प्रवासाचा वेग वाढवण्यासाठी आणि प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी आज राज्य सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डीसीएम देवेंद्र फडणवीस यांची आज दुपारी सह्याद्री राज्य अतिथीगृह, मुंबई येथे मुंबई रेल्वे विकास महामंडळ (MRVC) प्रकल्पांबाबत बैठक झाली. यावेळी मुंबई रेल्वे विकास महामंडळच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प सादर केले.
नवी मुंबईतील नवीन विमानतळासह मुंबई महानगर प्रदेशाच्या उत्तर आणि पूर्वेकडील भागाकडे वेगाने होत असलेल्या विकासामुळे, उपनगरीय वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण आणि विस्तार करणे आवश्यक झाले आहे. या संदर्भात 33,690 कोटी किमतीच्या प्रकल्पांना आज मंजुरी मिळाली. या रेल्वे विकास कामांना केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार या दोघांकडून निधी मिळणार आहे.
🚉 Good news for millions of railway passengers in Mumbai Metropolitan Region (MMR)!
More decisions taken today to speed up your journey and reduce travel time! 😊
🚉 CM Eknath Shinde and DCM Devendra Fadnavis held a meeting regarding Mumbai Railway Development Corporation… pic.twitter.com/hzqWdWpdcA
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) April 3, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)