साकीनाका मध्ये आज पहाटे इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअरच्या दुकानामध्ये आग लागली होती. या आगीत दुकान जळून खाक झाले आहे. साकीनाका परिसरामध्ये मेट्रो स्टेशन जवळ असलेल्या दुकानामध्ये ही आग लागली होती. आगीचं वृत्त समजताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहचलं. त्यांनी आग विझवली पण काही काळात पुन्हा आगीचा भडका उडाला आहे. यात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या अग्निशमन दल घटनास्थळी दाखल असून त्यांच्याकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
पहा ट्वीट
Mumbai, Maharashtra | One man died in a fire that broke out at an electronics and hardware store near Saki Naka Metro Station in Andheri (E). Five fire tenders present at the spot. Details awaited.
— ANI (@ANI) March 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)