महाराष्ट्रात आता नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. या अनुषंगाने आज दुपारी भाजपचे कोअर टीम लीडर देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. एकनाथ शिंदे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या निवासस्थानावरून राजभवनाकडे रवाना झाले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 1 जुलै रोजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यासाठी राजभवनात एक छोटासा कार्यक्रम होणार आहे. सुरुवातीला छोटे मंत्रिमंडळ असेल, त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि नंतर इतर मंत्र्यांचा शपथविधी होईल.
#WATCH | Mumbai: Eknath Shinde & BJP leader Devendra Fadnavis leave the latter's residence for Raj Bhawan pic.twitter.com/1ix6FCGApQ
— ANI (@ANI) June 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)