Mumbai: मुंबई पोलिसांनी अरबी समुद्रात ‘अब्दुल्ला शरीफ’ नावाची एक संशयास्पद बोट पकडली आहे. ही बोट कुवेतहून आली असल्याचे सांगण्यात येत होते. पोलिसांनी बोटीवर उपस्थित तिघांना ताब्यात घेतले आहे. सध्या पोलिसांनी बोट ताब्यात घेऊन गेटवेवर आणली आहे. संशयास्पद बोट पकडल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज बोटीने तीन जण कुवेतहून गेटवे ऑफ इंडिया येथे आले आहेत. ही बोट गेटवेवर उभी करण्यात आली असून, तिची पूर्ण तपासणी करण्यात आली आहे. यामधील तीन व्यक्ती भारतातील तामिळनाडू येथील आहेत. यामध्ये आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळले नाही.

माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या अरबी समुद्रात काही हालचाल पोलिसांना दिसली. येथे एक संशयास्पद बोट दिसल्याचे वॉच टॉवरवरून उघड झाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयास्पद बोट ताब्यात घेतली. याबाबत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. (हेही वाचा: Mumbai Crime News: मुलुंड येथे पूर्व वैमनस्यातून 16 वर्षीय मुलाची हत्या, दोन अल्पवयीन आरोपींवर गुन्हा दाखल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)