
Mumbai Crime News: मुंबईत किरकोळ वादातून एका 16 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेअंतर्गत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. ही घटना मुंबईतील मुलुंड येथे घडली आहे. दोन अल्पवयीन मुलांनी धारदाक शस्त्राने हल्ला करत खून केला आहे. राकेश शुक्ला असं मृत व्यक्तीचे नाव आहे. मुलुंड पोलिसांनी दोघांवर तात्काळ कारवाई केली. त्यानंतर त्यांना बालसुधारगृहात ठेवले आहे. तिघे ही मुंलूड येथील रहिवासी होते. हेही वाचा- अलीगढमध्ये दोन वर्षांच्या मुलीवर बलात्कार; अल्पवयीन तरुणाला अटक, गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीं आणि राकेश यांच्या जुना वाद होता, त्या वादात दोन्ही आरोपींनी काल संध्याकाळी हत्या केल्याचे समोर आले आहे. राकेशवर दोघांन्ही धारदार शस्त्राने वार करून त्याची निर्घृण हत्या केली. हत्येची माहिती मिळताच,मुलुंड पोलिसांची कारवाई सुरु झाली. आंबेडकर क्रॉसरोडवरून जात असताना, ही घटना घडली. राकेश हा एका फर्मसाठी अजेट म्हणून काम करत होता. हत्येचं कारण अद्याप समोर आलं नाही.
सुरुवातीला दोघांत वाद झाले होते, वाद टोकाला गेला. एकाने चाकू काढून वार केला त्यानंतर दुसऱ्या आरोपी मुलाने देखील सपासप वार केला.यात राकेश गंभीर झाला आणि तो रक्तबंबाळ अवस्थेत पडून राहिला. घटनेची माहिती पोलिसांना दिली.पोलिसांनी राकेशचा मृतदेह रुग्णालयात दाखल केला. आरोपींवर गुन्हा दाखल करत कारवाई सुरु केली.पोलिसांनी भारतीय दंड संहिता च्या कलमा नुसार ३०२ आणि३४ असा गुन्हा दाखल केला. या खळबळजनक घटनेचा तपशील उलगडण्यासाठी पोलिसांचा तपास सुरु आहे.