UP Shocker: अलीगढमध्ये दोन वर्षांच्या मुलीवर बलात्कार; अल्पवयीन तरुणाला अटक, गुन्हा दाखल
Stop Rape | Representational Image (Photo Credits: File Image)

उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये (Aligarh) दोन वर्षांच्या मुलीवर बलात्कार (Rape) झाल्याची घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या 17 वर्षांच्या तरुणाने चॉकलेटच्या बहाण्याने मुलीला सोबत नेले आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपी अल्पवयीन तरुण पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांनी मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवून चौकशी सुरू केली आहे. अलिगडमधील अत्रौली पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली.

पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, मुलीच्या वडिलांनी शेजारी राहणाऱ्या तरुणावर बलात्काराचा आरोप केला आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी माहिती देताना सांगितले की, शेजारी राहणारा एक तरुण त्यांच्या मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने त्याच्या घरी घेऊन गेला. त्याने मुलीला आपल्या घरी नेले आणि तिच्यासोबत गैरकृत्य केले. मुलगी परतत असताना ती अस्वस्थ होती.

जेव्हा मुलीकडे विचारणा केली गेली तेव्हा तिने तिला जसे जमेल तसे घडलेली घटना सांगितली. त्यानंतर मुलीचे कुटुंबीय जाब विचारण्यासाठी आरोपी तरुणाकडे गेले मात्र त्याने गुन्हा मान्य केला नाही. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी येऊन आरोपी तरुणाला अटक केली. मुलीला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. (हेही वाचा: Murder Over Girlfriend Remarks: प्रेयसीबद्दल अनुद्गार, 24 वर्षीय तरुणाची हत्या)

याबाबत माहिती देताना क्षेत्र अधिकारी मोहम्मद अकमल खान यांनी सांगितले की, अत्रौली भागातील एका गावातून दोन वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची माहिती पोलीस स्टेशनला मिळाली. माहिती मिळताच पोलिसांना तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आले. पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून कुटुंबीयांच्या तक्रारीवरून अत्रौली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे.