Tripura News Today: प्रेयसीबद्दल काढलेल्या कथीत अनुद्गारावरुन एकास आपले प्राण गमवावे (Tripura Murder Case) लागल्याची धक्कादायक घटना घडली आगे. सायन भौमिक असे या तरुणाचे नाव आहे. तो केवळ 24 वर्षांचा आहे. अधिकाऱ्यांनी दिलल्या माहितीनुसारह ही घटना त्रिपुरा राज्यातील अमतली पोलिस स्टेशनच्या उत्तर मध्यपारा भागात शुक्रवारी (2 फेब्रुवारी) उघडकीस आली. सायन याने कथीतरित्या सम्राट देबनाथ नामक तरुणाच्या प्रेयसीबद्दल अनुद्गार काढल्यावरुन त्याची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी सम्राट देबनाथ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणाला अटक झाल्याचे वृत्त नाही.
प्रेयसीबद्दल काढलेल्या उद्गारांवरुन वाद
आरोपी सम्राट देबनाथ हा आमतळी परिसरातील दुकानात कामाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये सांगितले की, आरोपी आणि पीडित यांच्यात प्रेयसीबद्दल काढलेल्या उद्गारांवरुन वाद होता. या वादातून दोघांमध्ये उत्तर मध्यपारा परिसरात खटका उडाला. ज्याचे पर्यावसन भांडणात आणि पुढे मोठ्या हाणामारीत झाले. ज्यामध्ये सायन भौमिक याचा मृत्यू झाला. आरोपीने पीडितावर लोखंडी रॉडने हल्ला चढवला. या प्राणघातक हल्ल्यात घाव वर्मी लागल्याने पीडिताचा मृत्यू झाला. सम्राट देबनाथ असे आरोपीचे तर सायन भौमिक असे पीडिताचे नाव आहे. (हेही वाचा, Delhi Crime: दिल्लीतील बुरारी येथे राहत्या घरात सापडला महिलेचा मृतदेह, हत्या झाल्याचा संशय)
किरकोळ वादाने घेतले हिंसक वळण
पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, सायनने सम्राटच्या मैत्रिणीबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद वाढला. पुढे विकोपाला गेला. त्यातून आरोपीने हिंसक कृती करण्यास सुरुवात केली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, सम्राटने सुरुवातीला सायनवर लोखंडी रॉडने हल्ला केला. त्यानंतर तो पुरता जायबंदी झाल्यावर त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले. परिणामी तो गंभीर जखमी झाला. स्थानिक रहिवाशां आणि कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी दाखवलेल्या सजगतेमुळे हल्लेखोराला तातडीने पकडण्यात आले. (हेही वाचा- कोचिंग हब कोटा येथे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, दोन आठवड्यातील तिसरा मृत्यू)
आरोपीचा पोलीस आणि स्थानिकांवर हल्ला
दरम्यान, आरोपीला ताब्यात घेताना त्याने केवळ पोलिसांना प्रतिकारच केला नाही तर त्याने पोलीस आणि जमावर हातातील चाकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आरोपी पोलीस आणि कायद्याला जुमानत नसल्यामुळे पोलिसांनी अतिरीक्त पोलीसांचे मनुष्यबळ मागवले. त्यानंतर त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, फॉरेन्सिक तज्ञ, पोलीस कर्मचारी आणि एसपी पश्चिम जिल्हा घटनेचा पुढील तपास करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले.
आरोपी सम्राट देबनाथ यास तत्काळ अटक केल्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी ठोठावली. क्षुल्लक कारणामुळे टोकाचे पाऊल गाठण्याचे प्रमाण तरुणाईमध्ये मोठ्या प्रमावर वाढत आहे. यातून हत्या, गंभीररित्या जखमी करणे, आत्महत्या यांसारखे प्रकार पुढे येऊ लागल्याने सामाजिक पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे.