Crime (PC- File Image)

Delhi Crime:  दिल्लीतील बुरारी भागात एका 38 वर्षीय महिलेचा राहत्या घरात मृतदेह आढळल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी बुरारी पोलिस ठाण्यात चौकशी सुरु आहे. कविता असं मृत महिलेचे नाव असून ती बुरारी येथील खड्डा कॉलनी येथील रहिवासी आहे.  शुक्रवारी पोलिस ठाण्यात महिलेचा मृतदेह आढळून आल्याचा फोन आला होता. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. (हेही वाचा- कोचिंग हब कोटा येथे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, दोन आठवड्यातील तिसरा मृत्यू)

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना महिलेचा मृतदेह आढळून आल्याचा फोन आल्यानंतर तात्काळ पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. महिलेचा मृतदेह बंद खोलीत आढळून आला. महिलेची हत्या झाल्याचे पोलिसांना संशय आला आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलमांच्या अंतर्गत 302 (हत्या) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पुढील कारवाई पोलिसांनी चालू केला आहे.

मृत महिला बुरारी परिसरात एका इमारतीच्या खोलीत राहत होती. कोणीतरी महिलेची धारदार शस्त्राने हत्या केल्याचे दिसून आले. पोलिसांनी महिलेच्या राहत्या घरात तपासणी केली. कोणतीही सशंयित वस्तू पोलिसांच्या हाती लागली नाही. परिसरात या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. दिल्लीत गुन्हे गारीचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.