Student Suicide In Kota: राजस्थानमधील कोटा येथे बी.टेकच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याने त्याच्या पीजी (पेइंग गेस्ट) खोलीत पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, नूर मोहम्मद (27) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. माहितीनुसार, विद्यार्थ्याने बुधवारी केव्हातरी हे टोकाचे पाऊल उचलले, मात्र गुरुवारी रात्री विज्ञान नगर परिसरात असलेल्या पीजी येथील खोलीत त्याचा मृतदेह सापडला. कोटा येथे दोन आठवड्यातील ही तिसरी आत्महत्या आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा येथील रहिवासी असलेला मोहम्मद चेन्नईच्या एसआरएम विद्यापीठातून बीटेकचे शिक्षण घेत होता आणि कोटा येथे पेइंग गेस्ट म्हणून राहत होता. मोहम्मदने 2016 ते 2019 या कालावधीत प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी कोटामधील कोचिंग संस्थांमध्ये शिक्षण घेतले आणि एसआरएम विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर तो कोटा येथील पीजीमधून ऑनलाइन वर्ग घेत होता. (हेही वाचा: Lucknow Shocker: मलिहाबादमध्ये तिहेरी हत्याकांड; जमिनीच्या वादातून तिघांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या)
Engineering Student Dies By Suicide In Coaching Hub Kota, 3rd Death In 2 Weekshttps://t.co/SXz6got7Hu pic.twitter.com/Wy712hp5Ig
— NDTV (@ndtv) February 2, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)