Lucknow Shocker: मलिहाबादमध्ये तिहेरी हत्याकांड; जमिनीच्या वादातून तिघांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या (Watch Video)
Triple Massacre in Malihabad (PC - X/@suraj_livee)

Lucknow Shocker: जमिनीच्या वादातून उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखनौतून (Lucknow) अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. मलिहाबाद (Malihabad)च्या मोहम्मद नगर भागात शुक्रवारी दुपारी जमिनीच्या वादातून एका विवाहित जोडप्याची आणि त्यांच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या (Murder) करण्यात आली. मुनीर खान, त्यांची पत्नी फरहीन आणि मुलगा हंझाला अशी मृतांची नावे आहेत. मलिहाबादमध्ये झालेल्या तिहेरी हत्याकांडाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, फरहीन (वय 35, रा. मोहम्मदनगर, मलिहाबाद) हिचा काका लल्लन याच्याशी जमिनीवरून वाद सुरू होता. याप्रकरणी शुक्रवारी दोन्ही पक्ष जमिनीच्या मोजमापात व्यस्त होते. यावेळी दोन्ही पक्षांमध्ये वादावादी झाली. यावेळी लल्लनच्या बाजूच्या लोकांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गोळीबारादरम्यान मुनीर (55), त्याचा मुलगा हंजल (16) आणि फरहीनला गोळ्या लागल्या. (हेही वाचा -हैदराबादमध्ये TSRTC बस कंडक्टरवर महिलेचा प्राणघातक हल्ला, व्हिडिओ भडकला)

अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात घबराट पसरली होती. गोळी लागल्याने मुनीर, फरहीन आणि हंजल यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर सर्व आरोपी तेथून पळून गेले. दिवसाढवळ्या तीन जणांच्या हत्येची बातमी मिळताच डीसीपी पश्चिम राहुल राज आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सध्या पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. (हेही वाचा - तेलंगणाच्या Vikarabad Railway Station वर प्रवासी घसरून प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या फटीत पडला; प्लॅटफॉर्म फोडून वाचवले प्राण (Watch Video))

पहा व्हिडिओ - 

या घटनेबाबत मलिहाबाद येथील सीएचसीबाहेर मृतांच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला. आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी त्यांची मागणी आहे. कारमधील हल्लेखोरांनी कुटुंबावर गोळीबार केला. ज्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.