हैदराबादमध्ये एका महिलेने तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ (TSRTC) बस कंडक्टरला शाब्दिक शिवीगाळ आणि शारिरीक मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने प्रसारित झाला आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, सदर महिला महिला शाब्दिक शिवीगाळ करताना आणि बस कंडक्टरवर शारीरिक अत्याचार करताना दिसते आहे. शिवाय, तिने बसमधील इतर प्रवाशांशी असभ्य आणि आक्षेपार्ह वर्तन केले. सोशल मीडिया युजर्सचे आहे की भाडे भरण्याच्या वादातून किंवा तिकिटाशी संबंधित वादातून हा वाद झाला असावा. TSRTC ने या घटनेची तातडीने दखल घेत महिलेविरुद्ध औपचारिक तक्रार दाखल केल्याचे समजते.
व्हिडिओ
In an incident that took place in Hyderabad, a woman assaulted Telangana State Road Transport Corporation (TSRTC) bus conductors.
The woman, reportedly in a drunken condition, not only created a nuisance on the bus and used abusive words but also kicked TSRTC bus conductors.
In… pic.twitter.com/ZncD45N00a
— The Siasat Daily (@TheSiasatDaily) January 31, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)