
Mumbai: मुंबईतील पवई (Pawoi) येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राहत्या खोलीत एका २३ वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह (Deathbody)आढळला आहे. गुरुवारी ही घटना उघडकीस आली आहे. रात्रीच्या 8.30 वाजता हा मृतदेह आढळून आला. विद्यार्थ्याच्या मृत्यूची माहिती पोलिसांनी कुटुंबियांना दिली आहे. या घटनेनंतर कॉलेजमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- पुण्यात मित्रासोबत बाहेरगावी गेलेल्या 21 वर्षीय तरुणीवर अज्ञातांकडून सामूहिक बलात्कार, पोलीस आरोपीच्या शोधात)
मिळालेल्या माहितीनुसार, खोलीत कोणी नसताना विद्यार्थ्याने आत्महत्या केली असवी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. परंतू खोलीत मृताजवळ कोणतेही सुसाईट नोट सापडले नाही. त्यामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू कश्याने झाला अशी चर्चा परिसरात चालू आहे. जेव्हा त्याच्या रुममध्ये बाहेरून आला त्याने दरवाजा ठोकला. पंरतू कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांनी खिडकीतून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने दुसऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला.
दरवाजा तोडल्यानंतर विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि त्यानंतर राजवाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी विद्यार्थ्याच्या अपघाती मृत्यूची नोंद घेतली. पोलिसांनी सांगितले की, मुलाच्या खोलीत तपासणी केल्यानंतर कोणतीही सुसाईट नोट सापडली नाही.