म्हाडाच्या कोकण विभागातील  2,147 घरांसाठी सोडतीचा निकाल आज ( 5 फेब्रुवारी) जाहीर केला जाणार आहे. ठाण्यात काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये हा सोडतीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान भाग्यवान विजेत्यांना त्यांच्या मोबाईल नंबर वर निकाल कळवला जाणार आहे. तसेच संंध्याकाळी म्हाडाच्या वेबसाईट वर निकाल, प्रतिक्षायादी जारी केली जाणार आहे. आजच्या निकालामध्ये 2147 घरांचा समावेश आहे तर 117 भूखंडांसाठी निकाल जाहीर होणार आहे.

कोकण विभागाच्या घरांसाठी सोडतीचा निकाल इथे पहा

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)