सध्या चीनसह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. भारतामध्येही BF.7 या प्रकारचे काही रुग्ण आढळले आहेत. अशा केंद्र सरकारने जनतेला काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जगातील कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करतानाच सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे मुख्य सचिवांनी देखील तातडीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून कोविड अनुरूप वर्तन, पंचसूत्रीचे काटेकोर पालन होईल, हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

महाराष्ट्राचे गृहमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले की, ते पुन्हा एकदा 5 पॉइंट प्रोग्राम सुरु करतील, ज्यामध्ये चाचणी, ट्रॅक, उपचार, लसीकरण आणि कोविड-19 योग्य वर्तन सुनिश्चित करणे यांचा समावेश आहे. तसेच विमानतळावरील 2% प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करण्यात येत आहे. त्यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्रात एकूण 95 टक्के लसीकरण झाले आहे त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. सध्या तरी मास्क अनिवार्य नाही. सर्व स्थानिक अधिकाऱ्यांना आढावा बैठका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)