Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना निवडणुकीच्या काळात काही समस्यांना सामोरे जावे लागेल. येत्या 19 व 20 नोव्हेंबर रोजी मतदानादरम्यान दोन दिवस स्कूल बस सेवा बंद राहणार आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या (आरटीओ) निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. स्कूल बस ऑनर्स असोसिएशन महाराष्ट्र (SBOA) ने पुष्टी केली आहे की, 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी स्कूल बस मुलांसाठी धावणार नाहीत, कारण ही वाहने मुंबई आणि आसपासच्या परिसरात निवडणूक वाहतूक गरजांसाठी वापरली जाणार आहेत. अनेक शिक्षकांना निवडणूक बूथ कर्तव्ये सोपवण्यात आली आहेत, त्यामुळे नियमित वर्गांसाठी उपलब्ध कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. यामुळे शाळेच्या नेहमीच्या वेळापत्रकात व्यत्यय येण्याची अपेक्षा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राज्य सरकारने शाळेचा परिसर मतदान केंद्र म्हणून वापरण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा: Maharashtra Assembly Elections: धक्कादायक! विधानसभा निवडणुकीत 97 मतदारसंघांमध्ये एकही महिला उमेदवार नाही)
Maharashtra School Bus Operators To Halt Services On November 19, 20 For Election Duty; Schools May Declare Holidayhttps://t.co/UhZnYPonjq#Maharashtra #Electionduty #Mumbainews #Busservices #Mumbaischools
— Free Press Journal (@fpjindia) November 10, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)