Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्र विधानसभेसाठी कॉंग्रेस 20 ऑगस्टपासून करणार निवडणूक प्रचाराला सुरुवात; जागावाटपाबद्दल चर्चा सुरु

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुंबईत काँग्रेसची मोठी बैठक झाली. त्यात काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल सहभागी झाले होते.

Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्र विधानसभेसाठी कॉंग्रेस 20 ऑगस्टपासून करणार निवडणूक प्रचाराला सुरुवात; जागावाटपाबद्दल चर्चा सुरु
Congress

Maharashtra Assembly Elections 2024: आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुंबईत काँग्रेसची मोठी बैठक झाली. त्यात काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी पक्षाच्या तयारीचा आढावा घेतला तसेच पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी महत्त्वाचे निर्देश दिले. बैठकीनंतर केसी वेणुगोपाल म्हणाले की, ‘आजची बैठक निवडणुकीच्या तयारीबाबत होती. काँग्रेस मजबूत करण्यावर चर्चा झाली. आम्ही एकजूट राहणार आहोत. या भ्रष्ट सरकारला महाराष्ट्रातून हटवण्याचा आमचा उद्देश आहे. हे सरकार नैसर्गिक सरकार नाही. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आमच्या आघाडीने चमकदार कामगिरी केली. मला विश्वास आहे की भ्रष्ट आणि बेकायदेशीर एनडीए सरकार हटवण्यासाठी आम्ही एकत्र काम करू आणि महाराष्ट्रात लोकाभिमुख सरकार स्थापन करू.’

वेणुगोपाल पुढे म्हणाले की, ‘काँग्रेस पक्ष 20 ऑगस्टपासून औपचारिकपणे निवडणूक प्रचाराला सुरुवात करेल. या दिवशी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी (NCP- SP) यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे.’ (हेही वाचा: मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजनमधून तब्बल 1,088 कोटी रुपयांची तरतूद; पालकमंत्री Mangal Prabhat Lodha यांची माहिती)

पहा पोस्ट-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 19, 2024 11:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).