महापरिनिर्वाण दिन निमित्त मध्य रेल्वे चालवणार 14 अनारक्षित विशेष फेर्या चालवणार आहेत. यामध्ये नागपूर-मुंबई अनारक्षित विशेष 3, दादर ते सेवाग्राम/अजनी/नागपूर अनारक्षित विशेष 6 फेर्या आहेत. कलबुर्गी-मुंबई अनारक्षित विशेष 2 फेर्या आहेत. सोलापूर-मुंबई अनारक्षित विशेष 2 फेर्या आहेत. अजनी-मुंबई वन-वे अनारक्षित विशेष एक फेरी आहे. या सार्या विशेष फेर्यांचं वेळापत्रक मध्य रेल्वेकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. महापरिनिर्वाण दिनी मुंबईच्या दादर परिसरामध्ये भीम सैनिक मोठ्या संख्येने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी येतात. Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Diwas Images: महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार Facebook Image, WhatsApp Status द्वारे शेअर करत करा अभिवादन .
पहा ट्वीट
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे महापरिनिर्वाण दिनानिमित्त १४ अनारक्षित विशेष फेऱ्या चालवणार आहे.
🟠नागपूर-मुंबई अनारक्षित विशेष (३ फेऱ्या)
➡️विशेष ट्रेन क्र. ०१२६२-
नागपूर येथून दि. ४.१२.२०२३ रोजी २३.५५ वाजता निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला… pic.twitter.com/bge28zTrcG
— Central Railway (@Central_Railway) November 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)