Mahaparinirvan Din Quotes in Marathi: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते दलितांचे उद्धारदाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. BR Ambedkar) यांचा आज (6 डिसेंबर) 66 वा महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din) आहे. 6 डिसेंबर 1956 दिवशी बाबासाहेबांनी दिल्ली मध्ये अखेरचा श्वास घेतला होता. त्यामुळे या दिवसाचं औचित्य साधत देशभरातील आंबेडकरी जनता, बौद्ध धर्मीय तसेच भीम अनुयायी दादर शिवाजी पार्क येथील चैत्यभूमीवर येऊन त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतात. भारतीय समाजातील जातीव्यवस्थेतील त्रृटी समोर आणत आंबेडकरांनी दलित, अस्पृश्य समजल्या जाणार्यांना आधार दिला. बौद्ध धर्माचा अभ्यास करून त्याची शिकवण पुन्हा समाजात पसरवण्याचं काम विविध मार्गांनी केलं. सोबतच मागास राहिलेल्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार Facebook Image, WhatsApp Status द्वारे शेअर करत तुम्ही महामानवाला अभिवादन करु शकतात.
ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल,
त्याला लढावे लागेल, आणि
ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल,
कारण ज्ञानाशिवाय लढलात तर पराभव निश्चित आहे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन... विनम्र अभिवादन!
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/12/8-Mahaparinirvana-Din-2022-Msg.jpg)
सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही..
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/12/6-Mahaparinirvana-Din-2022-Msg.jpg)
समाजपरिवर्तनाचे शस्त्र मानून,
ज्यांनी शिक्षणाचा केला प्रसार..
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे होते हे थोर विचार..
महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/12/5-Mahaparinirvana-Din-2022-Msg.jpg)
मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तुत्वाची,
तू जगाला शिकवली व्याख्या, माणसातल्या माणुसकीची
तू देव नव्हतास, तू देवदुतही नव्हतास
तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास
महासूर्याला अभिवादन!
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/12/7-Mahaparinirvana-Din-2022-Msg.jpg)
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर याना 66 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त कोटी कोटी प्रणाम!
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/12/1-Mahaparinirvana-Din-2022-Msg.jpg)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)