Ramabai Ambedkar Punyatithi 2025: रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी प्रकाश आंबेडकर, चंद्रकांत पाटील सह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आदरांजली अर्पण
रमाबाई आंबेडकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी होत्या. रमाईंनी आपल्या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलत बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचं वयाच्या 37 व्या वर्षी 27 मे 1935 साली निधन झाले होते. आज त्यांच्या स्मृतिदिनाचं औचित्य साधत प्रकाश आंबेडकर, चंद्रकांत पाटील सह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी X पोस्टच्या माध्यामातून त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी त्यांना 'रमाई' म्हणतात. रमाईंनी अठ्ठावीस वर्षे बाबासाहेब आंबेडकर यांना साथ दिली. नक्की वाचा: Who Was Ramabai Ambedkar: रमाबाई आंबेडकर कोण होत्या?
अजित पवार यांची पोस्ट
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात माता रमाबाईंनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे अतुलनीय योगदान देत, संघर्षमय काळात सावलीप्रमाणे साथ दिली. माता रमाबाईंनी शोषित आणि वंचितांवर आपल्या मायेचे छत्र धरत, बाबासाहेबांच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्याला बळकटी प्रदान केली.… pic.twitter.com/qcfWjaTfG0
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 27, 2025
प्रकाश आंबेडकरांची आदरांजली
आज माता रमाई आंबेडकर यांचा स्मृतिदिन. आज आपण एका महान त्यागमूर्तीला अभिवादन करूया. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा जितका विचारांचा होता, तितकाच तो रमाईंच्या आधाराचा होता. अडचणींच्या काळात, संघर्षाच्या क्षणी आणि बाबासाहेबांच्या सामाजिक, राजकीय कार्याच्या प्रत्येक टप्प्यावर रमाई… pic.twitter.com/TXxWxziCIE
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) May 27, 2025
चंद्रकांत पाटील
त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन ! #माता_रमाई#RamaAamedkar pic.twitter.com/p6MkCypR40
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) May 27, 2025
महाराष्ट्र कॉंग्रेसची पोस्ट
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या पत्नी त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन pic.twitter.com/3LBOAdA9hw
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) May 27, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 27, 2025 10:53 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

