खारघर पोलिसांनी मंगळवारी रात्री खारघरमधील सेक्टर 12 मधील एका घरावर छापा टाकून दोन महिलांसह चार नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. त्यापैकी दोघांना 1.29 कोटी रुपयांचे मेथाक्वॉलोन ड्रग्ज सह जप्त केले. नायजेरियन नागरिकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्यांना झडप घालून ताब्यात घेतले. छाप्यादरम्यान, पोलिसांनी 772 ग्रॅम मेथाक्वॉलोन (एमडी) ड्रग्ज जप्त केले. खारघरमधील सेक्टर 12 मधील दोन फ्लॅटमधून नायजेरियन नागरिकांकडून अमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती खारघर पोलिसांना मंगळवारी सायंकाळी मिळाली. पोलिसांनी या माहितीच्या आधारे छापा टाकून कारवाई केली.
ट्विट
Kharghar Drug Bust Case: Two Women Among 4 #Nigerians Held With #Drugs Worth ₹1.29 Crore
By: @s_amit007#kharghar #drugbustcase
Read more: https://t.co/54JPjvnAOi pic.twitter.com/A7QBDC8gcH
— Free Press Journal (@fpjindia) July 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)