Jayant Patil on NEET : 'देशाच्या भविष्यासोबत केंद्र सरकारचा खेळ'; NEET मधील गडबडीवरुन जयंत पाटलांचा टोला
देशात नीट परीक्षांवरून सध्या जबरदस्त गोंधळ सुरू आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहे. लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. या गोंधळावर जयंत पाटील यांनी मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
Jayant Patil on NEET : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप सरकारला नीट परीक्षांवरून घेरले आहे. जयंत पाटील(Jayant Patil) यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून भावना व्यक्त करत नरेंद्र मोदींच्या सरकारवर (Modi Government)जोरदार हल्ला चढवला आहे. जयंत पाटील म्हणाले की, पहिल्या दहा दिवसांतच यूजीसी नीट परीक्षा रद्द झाली, नीट परीक्षा पेपर फुटल्याने रद्द झाली आणि आता नीटची(NEET) पदव्युत्तर परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली. ‘देशाचे भविष्य हे देशाच्या वर्गखोल्यांमध्ये आकार घेत आहे’ असे कायम बोलले जाते, मात्र याच देशाच्या भविष्यासोबत केंद्र सरकार अक्षरशः खेळत आहे. अवघ्या १२ तास आधी परीक्षा रद्द करणे नक्की कशाचे द्योतक आहे ? मुळात अशा प्रवेश परीक्षा राज्य पातळीवर घेण्यात येऊन राज्यांना याबाबतीत अधिक स्वायत्तता दिली जावी, मात्र केंद्र शासनाला सर्व काही स्वतःच्या हातात ठेवायचे असल्याने या अडचणी उद्भवत आहेत. या अनागोंदीमुळे उद्विग्न उद्या काही तरुण तरुणींनी टोकाचे निर्णय घेतले तर त्याची जबाबदारी केंद्र सरकारची असेल..' (हेही वाचा: NEET, UGC-NET Controversies: एनईईटी, यूजीसी-नेट परीक्षा वादानंतर केंद्राचा मोठा निर्णय, Public Examinations Act, 2024 लागू)
पोस्ट पाहा-
नरेंद्र मोदीजी यांनी सत्तेत आल्यावर पहिल्या शंभर दिवसांत अनेक क्रांतिकारी निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते, त्याप्रमाणेच अनेक क्रांतीकारी गोष्टी घडल्याही आहेत.
पहिल्या दहा दिवसांतच यूजीसी नेट परीक्षा रद्द झाली, नीट परीक्षा पेपर फुटल्याने रद्द झाली आणि आता नीटची पदव्युत्तर…
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 23, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 23, 2024 12:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

