नुकतेच पुण्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आल्याची घटना घडली. त्यानंतर मंत्र्यांच्या सुरक्षेमध्ये त्रुटी राहिल्याच्या कारणाने 10 पोलिसांचे निलंबन करण्यात आले. आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावरचे शाईफेक प्रकरण, पोलिसांचे निलंबन, कार्यकर्त्यावर लावलेला मनुष्यवधाचा गुन्हा या सर्व प्रकरणात राज ठाकरे यांनी मध्यस्थी करावी अशी इच्छा सर्वपक्षीय शिष्टमंडळाने त्यांच्याकडे व्यक्त केली होती. मध्यस्थीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी, नागरी संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पिंपरी चिंचवड येथे राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज ठाकरे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर त्यांनी या प्रकरणावर त्यांची भूमिका मांडली आहे. जे घडले ते चुकीचे घडले मात्र, पोलिसांवरील कारवाई अनाठायी वाटली असे त्यांनी म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)