Ink Throw On Chandrakant Patil: भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आज पिंपरी-चिंचवड येथे त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. शाळा सुरू करण्याकरता सरकारच्या अनुदानावर अवलंबून का राहता? असा सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी करत 'महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली होती,' असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांच्या या विधानाविरोधात राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन झाली आहेत. (हेही वाचा - Maharashtra Politics: चंद्रकांत पाटलांच्या 'त्या' वक्तव्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक, आंदोलन करत नोंदवला निषेध)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)