Maharashtra Politics: चंद्रकांत पाटलांच्या 'त्या' वक्तव्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक, आंदोलन करत नोंदवला निषेध

पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरत चंद्रकांत पाटलांविरुध्द निदर्शने करत त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवला.

Maharashtra Politics: चंद्रकांत पाटलांच्या 'त्या' वक्तव्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक, आंदोलन करत नोंदवला निषेध
चंद्रकांत पाटील (Photo credit : Mumbai Live)

राज्यातील वातावरण हल्ली वादग्रस्त विधानांमुळे तापलं आहे. एकामागे एक काही विधानांच्या पार्श्वभुमिवर राज्यभरात संतापची लाट उसळताना दिसत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंगलप्रभात लोढा आणि आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे एकदा पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक झाल्याचं घायला मिळाली. पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरत चंद्रकांत पाटलांविरुध्द निदर्शने करत त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवला. पुण्यातील कोथरुड परिसरातील मंत्री चंद्रकांत पाटलांच्या कार्यलयाजवळ आंदोलन केले. तर परिसरात बॅनरबाजी करत पाटलांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला. तरी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेत पुणे पोलिसांकडून या परिसरात कडक बंदोबस्त करण्यात आला होता. एवढचं नाही तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात देखील विद्यार्थ्यांच्या वतीने चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला.

 

तर औरंगाबादेत देखील वंचित बहुन आघाडीच्या वतीने आंदोलन करत चंद्रकांत पाटलांच्य़ा वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला. औरंगाबादेत देखील पाटलांच्या त्या वक्तव्याचे तीव्र प्रतिसाद उमटले असुन राज्यभरात संतापाची लाट उसळली असल्याचं चित्र आहे. शिवाय चंद्रकांत पाटील हे औरंगाबाद शहराचं आराध्य दैवत असलेल्या संस्थान गणपतीच्या दर्शनासाठी आले असता त्यांना विरोध दर्शवण्यात आला. चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. (हे ही वाचा:- Mumbai Roads: पुढील 30 वर्षांसाठी मुंबई खड्डेमुक्त होणार, उपग्रहाद्वारे होणार बांधकामच्या गुणवत्तेची पहाणी: देवेंद्र फडणवीस)

 

महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेबब आंबेडकर यांनी अनुदान न मागता भीक मागून शाळा सुरु केल्या, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. तरी पाटलांच्या या वक्तव्याचा निषेध संपूर्ण राज्यभरात नोंदवण्यात येत आहे. राजकीय पक्षांसह बहुजन समाजाकडून चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर पाटलांसह भाजपवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Dec 10, 2022 06:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).