Devendra Fadnavis | (File Photo)

मुंबईकरांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. तरी ही मुंबईकरांसाठी मोठी खुशखबरचं म्हणता येईल. कारण मुंबईकरांपुढे सध्या सर्वात मोठी कुठली समस्या असेल तर ती म्हणजे शहरातील रस्ते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात अजुनही बरेश्या महत्वाच्या भागात रस्त्याचे पार बारा वाजले आहेत. या रस्त्यांमुळे मुंबईकरांना ट्रॅफीक जॅम, रस्ते अपघात किंवा पावसाळ्यात रस्ते बंद सारख्या समस्येंना पुढे जावे लागणार आहे. पण मुंबईकरांची ही अडचण दुर करण्याचं काम आता शिंदे फडणवीस सरकारने प्राधान्य दिल्याचं समजत आहे. किंबहुना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील रस्त्यांसंबंधीत मोठी घोषणा केली आहे. पुढील ३० वर्षांसाठी मुंबई खड्डेमुक्त होणार असल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

 

बृहन्मुंबई महापालिकेद्वारे करण्यात येणाऱ्या विकासकामांचे भूमिपूजन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संबंधीत माहिती दिली आहे. मुंबईतील रस्ते दुरुस्तीकरण तसेच खड्डे असलेल्या रस्त्यांचं बांधकाम सुरु करण्यात येणार आहे. दरवर्षी मुंबई महापालिकेकडून रस्ते दुरुस्तीकरणाचं काम केल्या जातं पण काही महिन्यातचं रस्त्यांची परिस्थिती जैसे थे होते आणि मुंबईकरांचा त्रास सहन करावा लागतो.पण उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मात्र यावर लांब काळासाठीचा उपाय शोधुन काढला आहे. (हे ही वाचा:- Sanjay Raut On CM: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला कुलूप असून त्याची चावी दिल्लीत आहे, सीमावादावर संजय राऊतांची टीका)

 

मुंबईतील नव्याने सुरु होणाऱ्या रस्ते बांधकामावर थेट उपग्रहाच्या मदतीने पाहणी करण्यात येणार आहे. रस्ते बांधकामाची गुणवत्ता तपासण्यासाठी उपग्रहाचा वापर केल्या जाणार आहे. ज्यामुळे रस्त्यांचं बांधकाम अगदी उत्कृष्ठ पध्दतीने पुर्ण होईल तर हे रस्ते पुढील ३० वर्षांसाठी टिकतील असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत. मुंबईतील रस्ते बांधकाम हा बीएमसीसाठी आडमार्गाने पैसे कमावण्याचं साधन झालं आहे. पण दरवर्षी केल्या जाणारी लुट रोकण्यासाठी मुंख्मंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चहा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.