गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना दरवर्षी प्रमाणे यंदाही टोल माफ करण्यात आला आहे. यंदा शनिवार 27 ऑगस्ट पासून 11 सप्टेंबर दरम्यान प्रवास करणार्यांना टोल नाक्या वर ही सवलत असणार आहे. यासंदर्भातील पासेस व स्टिकर्स हे पोलीस आणि परिवहन विभागाकडे उपलब्ध असतील.
पहा ट्वीट
- गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर माफ करण्याचा मुख्यमंत्री @mieknathshinde यांचा निर्णय.
- त्याची अंमलबजावणी उद्यापासून करण्यात येणार असून पथकर नाक्यांवर ही सवलत ११ सप्टेंबरपर्यंत असणार. @CMOMaharashtra @DDNewslive @DDNewsHindi pic.twitter.com/fDVfByI670
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) August 26, 2022
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीत #पथकरमाफी (टोलमाफी) दिली आहे. मुंबई-बंगळुरू व मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांसाठी देखील ही सवलत असेल- मुख्यमंत्री @mieknathshinde यांची माहिती pic.twitter.com/mVRBSghLxW
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 26, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)