Fire In Kalbadevi: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आगीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. गेल्या आठवड्यात मुंबईतील तीन भागात लागलेल्या आगीच्या घटनांनंतर आज मुंबईतील काळबादेवी (Kalbadevi Fire) परिसरातील अजमेरा हाऊसच्या लोहार चाळमध्ये (Lohar Chawl) आगीची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आग एअर कंडिशनिंग युनिटमध्ये लागली होती. त्यानंतर वाऱ्यामुळे ती हळूहळू इमारतीत पसरली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. आगीच्या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये इमारतीतून आगीच्या ज्वाळा बाहेर पडताना दिसत आहेत.

काळबादेवी येथे आगीची घटना

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)