बुलढाण्यात काल (1 जुलै) बस पेटल्याचं वृत्त ताजं असताना आज सोलापूर मध्ये केके एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचं अजून एक वृत्त समोर आलं आहे. सोलापूरहून दिल्लीच्या दिशेने जाणार्या गाडी क्रमांक 12627 केके एक्सप्रेस या गाडीच्या इंजिनमध्ये सकाळी सोलापूर जवळील मलिक पेठ येथे पावणे 9 च्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने भीषण आग लागली. यामध्ये रेल्वे चालक भाजला आहे. तर प्रवासी सुखरूप आहेत. आग लागल्याचे रेल्वे चालकाच्या लक्षात येताच चालकाने सतर्कता दाखवत तात्काळ गाडी थांबवली. नक्की वाचा: Buldhana Accident: बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर प्रवासी बसचा भीषण अपघात, 25 प्रवाशांचा मृत्यू .
पहा ट्वीट
केके एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग, प्रवासी सुखरूप.
सोलापूरहून दिल्लीच्या दिशेने जाणार्या गाडी क्र.12627 केके एक्सप्रेस या गाडीच्या इंजिनमध्ये सकाळी सोलापूर जवळील मलिक पेठ येथे पावणे 9 च्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने भीषण आग लागली. रेल्वे चालक भाजला. pic.twitter.com/GJ7EW3CATm
— AIR News Pune (@airnews_pune) July 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)