समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg expressway ) पुन्हा एकदा एक भीषण अपघात झाला आहे. बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर प्रवासी बसचा (Buldhana Accident) अपघात होऊन 25 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्गावरुन ही बस नागपूरहून (Nagpur) पुण्याच्या (Pune) दिशेने चालली होती. त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ हा अपघात झाला. बसचा वेग जास्त असल्याने समोरील टायर फुटले. क्षणार्धात बसने पेट घेतला. बस दरवाजाच्या दिशेने उलटल्याने बसमधून प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे बस थेट दुभाजकाला धडकली. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या बसमध्ये 32 प्रवासी बसले होते. त्यापैकी 25 प्रवाशांचा मृत्यू झाला. जखमी प्रवाशांना बुलढाणा येथील सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आलं आहे.
पाहा ट्विट -
Maharashtra | At least 25 people feared dead and several injured after a bus carrying 32 passengers burst into flames on Samruddhi Mahamarg expressway in Buldhana. The injured are being shifted to Buldhana Civil Hospital: Dy SP Baburao Mahamuni, Buldhana
(Warning: Disturbing… pic.twitter.com/NLo8pcqpz3
— ANI (@ANI) July 1, 2023
अपघातग्रस्त बस ही नागपूरहून पुण्याकडे जात होती. त्यावळेळी हा अपघात घडला. या बसमध्ये नागपूर, वर्धा, आणि यवतमाळचे प्रवासी होते. ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. बस समृध्दी महामार्गावर रस्ता दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर बसने पेट घेतला. डिझेलच्या संपर्कात आल्याने बसने वेगाने पेट घेतला. त्यानंतर बसमध्ये असणाऱ्या 33 प्रवाशांपैकी आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले. तर 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुखरुप बाहेर पडलेल्यांमध्ये चालक आणि वाहकाचा समावेश आहे. (हेही वाचा - Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात चिमुकलीसह तिघांचा मृत्यू, 5 जण जखमी)
बस आधी लोखंडी पोलला धडकून नंतर रस्ता दुभाजकाला धडकली. बस उलटून बसचा दरवाजा गाडीखाली आल्याने कुणालाही बाहेर येता आलं नाही. वाचलेले काही प्रवासी काचा फोडून बाहेर आले अशीही माहिती मिळते आहे. अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर डिझेल सांडले आहे. बसने पेट घेतल्याने मृतदेह होरपळले आहेत. त्यांची ओळख पटवणंही कठीण झालं आहे अशीही माहिती समोर आली आहे.