Fire Erupts In Kalpataru Residency In Goregaon: गोरेगाव येथील एका निवासी इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत श्वासोच्छवासाचा त्रास झाल्याने दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी दुपारी 12.49 वाजता, गोरेगाव पश्चिमेतील निवासी उच्चभ्रू असलेल्या कल्पतरू रेडियन्स या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. जखमींना ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दुपारी 2.18 च्या सुमारास आग विझवण्यात आली. मात्र, आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.
मनोज चौहान (वय 30 ते 35 वर्षे) आणि शहाबुद्दीन (50) अशी आगीमुळे गुदमरलेल्या दोघांची नावे आहेत. दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) निवेदनात म्हटले आहे. ही आग 2 बेसमेंट + 3 पोडियम + निवासी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, घरगुती वस्तू आणि इतरांपर्यंत मर्यादित होती, असंही बीएमसीच्या निवेदनात नमूद केलं आहे. कल्पतरू रेडियन्स ही मुंबईच्या पश्चिम उपनगरातील एक भव्य निवासी इमारत आहे.
गोरेगावमधील 31 मजली कल्पतरू रेसिडेन्सीमध्ये आग -
कल्पतरू रेसिडेन्सी टॉवरमधील दुसऱ्या मजल्यावर लागलेली आग झपाट्याने इतर मजल्यांवर पसरू लागल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.#Goregaon pic.twitter.com/GKvuj31yaj
— SaamTV News (@saamTVnews) November 2, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)