राज्यात सुरु असलेले राजकीय वादळ शमण्याचे नाव घेत नाहीये. एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांनी बंडखोरी केल्याने मोठा गदारोळ माजला आहे. अशात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन करत परत येण्याची साद घातली. ‘तुम्ही लोक परत आलात तर तोडगा निघू शकेल. पक्षाध्यक्ष आणि कुटुंबप्रमुख या नात्याने मला अजूनही तुमची काळजी आहे’, असे ते म्हणाले.

आता या आवाहनाला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. ट्वीट करत ते म्हणतात, ‘एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं, नाल्याचीघाण, रेडा, कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचे, त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआसरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची, याचा अर्थ काय? ‘

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)