आज मुंबईच्या चारकोप येथे वीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जनतेला संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर पातळी सोडून टीका केली. यावेळी फडणवीस म्हणाले, ‘तुम्ही म्हणालात वीर सावरकरांनी माफी मागितली आणि इंग्रजांना पत्र लिहिले. ते चुकीचे आहे. सावरकरांनी पत्र लिहिले कारण त्यांना माहीत होते की इंग्रज त्यांना सोडणार नाहीत. म्हणून त्यांनी पत्रात लिहिले की, मला (सावरकर) सोडू नका, परंतु ज्यांनी तुमच्या (ब्रिटिशांविरुद्ध) काहीही केले नाही अशा इतर कैद्यांची सुटका करा.’

फडणवीस पुढे म्हणाले, ‘सावरकर यांच्यासोबत अनेक वर्षे तुरुंगात असणाऱ्या सावरकरांच्या नातेवाईकांना महात्मा गांधींनी पत्रे लिहिली व त्यामध्ये त्यांनी सांगितले की, इतर कैद्यांची सुटका झाली आहे. त्यानंतर त्यांनी सावरकरांना सांगितले की, तुम्हीही इंग्रजांना सांगा की जसे तुम्ही इतर कैद्यांना सोडले तसे मलाही सोडा.’ ते पुढे म्हणाले, ‘सावरकर यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना यातना सहन केल्या आणि चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेले सावरकरांना माफीवीर म्हणतात. तुमची लायकी तरी आहे का?. तुमच्या पक्षाचे नेते वीर सावरकरांचा आदर करतात. इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांनी सावरकरांचा सन्मान केला आणि तुम्ही त्यांना प्रश्न करत आहात, तुम्ही आहात तरी कोण?’

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)