राज्याच्या कृषीमंत्री दादा भूसे यांनी राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रमात हालगीच्या तालावर ठेका धरला. दादा भुसे यांचा तरुणांसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आपण येथे पाहू शकता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. त्यामुळे या सोहळ्याकडे अवघ्या महाराष्ट्रासह देशाचेही लक्ष लागले आहे. कृषीमंत्री भुसे हे देखील नाशिक येथूनच येतात.त्यांचा विधानसभा मतदारसंघही नाशिकमध्येच आहे. त्यामुळे या सोहळ्यावर भुसे यांचे बारीक लक्ष आहे. (हेही वाचा, PM Modi Road Show In Nashik: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक येथे रोड शो (Watch Video))

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)