खारघर येथील फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्सचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल पटेल जी यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. तमाम फुटबॉलपटू, फुटबॉल प्रेमी आणि व्यक्तिश: माझ्यासाठी ही स्वप्नपूर्ती आहे, असं मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे. क्रीडाक्षेत्रातील स्तर उंचावण्यासाठी आम्ही सर्वांसाठी स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचे प्रयत्न करत आहोत. नवी मुंबई आणि पनवेल ही शहरे आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि सुविधा यांच्या जोरावर भारताचे स्पोर्ट्स हब बनतील, अशी आशा आदित्य ठाकरे यांनी वर्तवली आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)