मराठा आरक्षण आंदोलन राज्यभर तापण्यास सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु केले असून त्यांची प्रकृती ढासळू लागली आहे. त्यामुळे त्यांच्यावर वैद्यकीय उपाचर करण्यासाठी डॉक्टर रवाना झाले आहेत. मात्र, असे असले तरी जरांगे यांनी उपचार करण्यास नकार दिला आहे. आरक्षण हाच माझ्यावरील उपचार आहे, असे जरांगे यांनी म्हटले आहे. दरम्यान, या आंदोलनास पाठिंबा म्हणून बीड येथील मराठा समाजातील नागरिकांनी कँडल मार्चचे आयोजन केले होते. ज्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या मोर्चाचा एक व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने आपल्या एक्स हँडलवर शेअर केला आहे. (हेही वाचा, Suicide News: मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, परभणीतील दुसरी घटना)
व्हिडिओ
#WATCH | Maharashtra: People held a candle march in Beed, in support of the Maratha Reservation. (29.10) pic.twitter.com/9sEbSeDsSy
— ANI (@ANI) October 30, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)