Suicide | (Photo Credits: unsplash.com)

Suicide News: परभणी जिल्ह्यात जिंतुर तालुक्यात मराठा आरक्षण मिळत नसल्याने एका तरुणाने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील मराठा आंदलनकर्ते पुन्हा आक्रमक झाले आहे. तालुक्यातील बोर्डी गावात राहणारा तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. बापुराव उत्तमराव मुळे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. माहितीनुसार परभरणी जिल्ह्यातून ही दुसरी घटना आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मागील अनेक दिवसांपासून आंदोलन राज्यात सुरु आहे. त्यांना पाठींबा देण्यासाठी परभणी देखील साखळी उपोषण करण्यात आले आहे.

उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या उपोषणाला अनेक तरुणांनी साथ दिली आहे. मनोज जरांगे यांनी तरुणांना आत्महत्या न करण्याचे आवाहन दिले. राज्यात ठिकठिकाणी आंदोलनाचे पडसाद दिसून येत आहे. मराठवाड्यात दोन दिवसांपूर्वी तीन तरुणांनी आत्महत्या केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बापुराव मुळे हे अंतरवाली सराटी येथील सभेला उपस्थित होते. आरक्षण मिळत नसल्याने बापुराव मुळे यांनी रविवारी राहत्या घरी गळफास लावून आयुष्य संपवले. त्यांच्या पश्चात तीन मुले आहे, तिघेही सरकारी शाळेत शिक्षण घेत आहे, या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली, घटनेची माहिती पोलीसांना देताचस घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी पांडूरंग गोफणे, तहसीवगार सरोदे, पोलिस उप निरिक्षक अनिल खिल्लारे यांनी भेट दिली. तरुणाच्या कुटुंबाला न्याय मिळावा याकरिता गावकऱ्यांनी मागणी केली आहे.