आज पहाटेच्या सुमारास बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. डिझेल टाकीचा स्फोट झाल्याने बसला भीषण आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघाताच्या वेळी बसमध्ये 32 जण प्रवाश करत होते. सध्या जखमींवर उपचार हे सुरु आहेत. या अपघातात बसचे चालक आणि वाहक हे बचावले आहेत. या दोघांना सध्या पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)