BJP MLA Sunil Kamble Slaps: कर्तव्यवर असताना पोलिस कर्मचाऱ्याला कानाखाली मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. आमदार सुनील कांबळे यांच्या या प्रतापामुळे पुणे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुणे पोलिसांच्यां बंडगार्डन पोलिस ठाण्यात सुनील कांबळे यांच्यावर IPC कलम 352 (लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी प्राणघातक हल्ला किंवा फौजदारी बल) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राजकारणात सुनील कांबळे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)