Sunil Kamble Slaps Police Officer: ऑन ड्युटी पोलिस अधिकाऱ्यांच्या कानाखाली मारली; आमदार सुनील कांबळे यांचा कारनामा रेकॉर्ड, पुण्यातील घटना

पुण्यातील ससून रुग्णालयात एका भाजप आमदाराने एका ऑन ड्युटी असलेल्या पोलिस अधिकाऱ्याला कानाखाली मारल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Sunil Kamble Slaps Police Officer: ऑन ड्युटी पोलिस अधिकाऱ्यांच्या कानाखाली मारली; आमदार सुनील कांबळे यांचा कारनामा रेकॉर्ड, पुण्यातील घटना
Sunil Kamble Slaps PC twitter

Sunil Kamble Slaps Police Officer: पुण्यातील ससून रुग्णालयात एका भाजप आमदाराने एका ऑन ड्युटी असलेल्या पोलिस अधिकाऱ्याला कानाखाली मारल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  धक्कादायक म्हणजे हा सर्व  प्रकार कॅमेरात रेकॉर्ड झाला आहे. रुग्णालयात तृतीयपंथीया करीता विशे, वॉर्ड तयार करण्यात आले असून त्याचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री  पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनावेळी फलकावर नाव नसल्याच्या रागातून भाजप आमदार सुनील कांबळे यांनी ऑन ड्युटी पोलिस अधिकाऱ्याच्या कानाखाली मारली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कांबळे यांनी कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला मारहाण केल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 05, 2024 04:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).