राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar). एकदम फटकळ आणि मोकळं-ढाकळं व्यक्तीमत्व. काम आणि शब्दाचा पक्का माणूस अशी जनमानसातील प्रतिमा. बोलण्याच्या बाबतीत म्हणाल तर एकदम ऐसपैस. कधी काय बोलतील याचा नेम नाही. अर्थात, धरणासंबंधी त्यांनी मध्यंतरी एक विधान केले आणि त्यांच्या बोलण्यातला मोकळेढाकळेपणा काहीसा कमी झाला. पण अजूनही ते अधूनमधून असे काही बोलून जातात. ज्यामुळे ते स्वत:च विरोधकांच्या टीकेचा आणि चर्चेचा विषय होतात. नुकताच त्यांनी राज्याच्या विधानसभेत एका चर्चेदरम्यान पीएचडी (Ajit Pawar Troll On PhD) करुन पोरं काय दिवे लावणार? असा सवाल केला आणि आख्खं सभागृहच गर्भगळीत झाले. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या केवळ राजकीयच नव्हे शैक्षणिक आणि सामाजीक वर्तुळातूनही त्यांच्यावर टीका झाली. थोडक्यात काय तर अजित पवार सोशल मीडियावर ट्रोल झाले. #काय-दिवे-लावले हा ट्रेण्डच सुरु झाला.
नेमकं काय घडलं?
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु आहे. अधिवेशनादरम्यान, सभागृहात सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सेवा, सुविधांवर चर्चा सुरु होती. आमदार सतेज (बंटी) पाटील आपला मुद्दा मांडत होते. दरम्यान, भाषणात त्यांनी पीएचडी बाबत मुद्दा उपस्थित केला. यावर पटील यांचे बोलणे मध्येच तोडत अजित पवार म्हणाले 'पण पीएचडी करुन पोरं काय दिवा लावणार'. अजित पवार यांच्या विधनामुळे अवघे सभागृह अवाक झाले. खरे तर अजित पवार यांना गंभीर व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाते. राज्याच्या अर्थकारणावर त्यांची चांगली पकड आणि सामाजिक दृष्ट्या जागरुक नेता अशी त्यांची ओळख आहे. पण, त्यांचे हे विधान ऐकून राजकीय आणि शैक्षणीक क्षेत्रातील लोकही हबकून गेले आहेत. (हेही वाचा, Ajit Pawar Letter: अजित पवार महायुतीत का गेले? पत्राद्वारे स्वत:च दिले स्पष्टीकरण, पाहा काय म्हणाले)
सतेज पाटील यांची मागणी काय?
आमदार सतेज पाटील यांनी सभागृहात मागणी केली की, सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यमान आकडेवारीनुसार ती केवळ 200 विद्यार्थ्यांपुरतीच मर्यादित आहे. ही मर्यादा वाढवली जावी. (हेही वाचा, Ajit Pawar On Nawab Malik: नवाब मलिक यांनी आपली भूमिका अधिकृतपणे मांडल्यानंतर मी माझा मुद्दा मांडणार; देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रानंतर अजित पवार यांची प्रतिक्रिया)
अजित पवार काय म्हणाले?
सतेज पाटील यांच्या मागणीवर अजित पवार यांनी ही संख्या वाढवून काय करणार? राज्यात होत असलेल्या एकूण पीएचडींपैकी आपल्याला किती पीएचडीची गरज आहे? इतक्या संख्येने पीएचडी करुन पोरं काय दिवा लावणार? अस काहीसे अनाकलनीय वक्तव्य अजित पवार यांनी केले. ज्यामुळे बसलेल्या धक्क्यातून सभागृह बऱ्याच वेळाने सावरले.
अजित पवार ट्रोल
अजित पवार यांच्या या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध केला जातो आहे. खास करुन ट्विटरवरुन अजित पवार यांना जोरदार ट्रोल केले जात आहे.
एक्स पोस्ट
हीच ती वेळ, हाच तो क्षण #काय_दिवे_लावणार #AjitPawar
— Shrimant Mane (@ShrimantManey) December 12, 2023
एक्स पोस्ट
शिक्षणाचं महत्व नसलेली लोकं सत्तेत बसली तर ती काय दिवे लावतात बघा.@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis @mieknathshinde@CMOMaharashtra @Prksh_Ambedkar @satejp#काय_दिवे_लावणार #महाराष्ट्र #PhD #Maharashtra pic.twitter.com/oqo6NA48U2
— R.Datta (@Datta201027) December 13, 2023
एक्स पोस्ट
एका वर्षात हा माणुस ईतका बदलला.#काय_दिवे_लावणार
पर्यंत पोहचला https://t.co/Pl7mSW6876 pic.twitter.com/4rGAVdxJVm
— Dharmendra Anamane (@DharmendraAnam1) December 13, 2023
एक्स हँडलवर एका युजरने अजित पवार यांचाच सभागृहातील जुना व्हिडिओ पोस्ट करत 'हीच ती वेळ, हाच तो क्षण #काय_दिवे_लावणार' असे म्हटले आहे. या व्हिडिओत ते सारथीमधील पीएचडीच्या मागणीबद्दल बोलताना दिसतात. आणखी एक यूजर्सने म्हटले आहे, ''शिक्षणाचं महत्व नसलेली लोकं सत्तेत बसली तर ती काय दिवे लावतात बघा''. या युजरनेही अजित पवार यांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. एक युजर तर अजित पवार यांना टॅग करत म्हणतो आहे की, एका वर्षात हा माणुस ईतका बदलला. #काय_दिवे_लावणार पर्यंत पोहचला