गेल्या अनेक वर्षांपासून भ्रष्टाचारामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना सोसाव्या लागणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी भाजप उद्या, 1 जुलै रोजी मुंबई शहरात दोन 'जन आक्रोश मोर्चा' काढणार आहे. भाजपचे शहरप्रमुख आशिष शेलार यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली. पत्रकार परिषदेत बोलताना शेलार म्हणाले, ‘शिवसेनेने (यूबीटी) काढलेला मोर्चा हा केवळ त्यांच्या गैरकृत्यांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न आहे. तो 'चोर मचाये शोर' सारखा आहे.’ आता मुंबईकरांना त्यांच्या खर्या तक्रारी मांडण्यासाठी सत्ताधारी आघाडी ‘महायुती’ हाच एकमेव पर्याय आहे. उद्या भाजप
शेलार यांनी सांगितले, ‘भाजप मुंबईतर्फे एक अनोखे आंदोलन करणार आहे. या आंदोलनाचे नाव ‘मुंबईकरांचा आक्रोश’ असे असेल. महायुतीतर्फे मुंबईत दोन ठिकाणी जन आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. युवा मोर्चा आणि महायुतीच्या घटक पक्षांतर्फे नरिमन पॉईंट येथील भाजपा प्रदेश कार्यालय तसेच महिला मोर्चा आणि महायुती घटक पक्षांतर्फे दादर स्वामीनारायण मंदिर येथे आक्रोश आंदोलन करण्यात येईल.’ (हेही वाचा: Uniform Civil Code: समान नागरी संहितेच्या केंद्राच्या मागणीला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा)
महायुतीतर्फे मुंबईत दोन ठिकाणी जन आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. युवा मोर्चा आणि महायुतीच्या घटक पक्षांतर्फे नरिमन पॉईंट येथील भाजपा प्रदेश कार्यालय तसेच महिला मोर्चा आणि महायुती घटक पक्षांतर्फे दादर स्वामीनारायण मंदिर येथे आक्रोश आंदोलन करण्यात येईल#BJP #JanAkrosh #Mumbai… pic.twitter.com/VjJ7z1sly9
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 30, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)