महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी बरोबर 1 महिन्यावर असताना आज भाजपा कडून 99 जागांवर उमेदवार यादी जाहीर झाली आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेंना उमेदवारी आहे. यामध्ये नुकतेच भाजपा मध्ये आलेल्या अशोक चव्हाण यांची लेक श्रीजयाला (Sreejaya Chavan)  भोकर मधून उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपाच्या आजच्या यादीमध्ये 15 महिला उमेदवार आहेत. दरम्यान महायुतींवर काही जागांवर अद्यापही बोलणी सुरू आहेत. पण ज्या ठिकाणी तिढा सुटला आहे त्या 99 जागा आज जाहीर करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपाची पहिली उमेदवार यादी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)