नववर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरच्या रात्री मुंबईतील सागर किनाऱ्यावर येणाऱ्या नागरिकांच्या सोईकरिता बेस्ट उपक्रमामार्फत जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. सर्व प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट परिवहन विभागाने केले आहे. दिनांक 31 डिसेंबर 2022 च्या रात्री नववर्ष स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच आणि मुंबईतील इतर ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर, चौपाटीवर रात्रीच्या वेळी फिरावयास जाणाऱ्या प्रवाशांच्या सोईसाठी जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.
दि. ३१ डिसेंबर २०२२ च्या रात्री नव वर्ष स्वागतासाठी बेस्ट उपक्रमच्या अतिरिक्त बसगाड्या चालविण्यात येणार आहेत. #bestupdates #Mumbai pic.twitter.com/aXI3c3s6lz
— BEST Bus Transport (@myBESTBus) December 29, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)