अहमदनगरहून आष्टीच्या दिशेने जाणाऱ्या मध्य रेल्वेला मोठी आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, रेल्वेचे काही डबे आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत. डीडी सह्याद्री या 'X' हँडलवरुन या घटनेचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सुरुवातीला दोन डब्यांना आग लागली. त्यानंतर ती आग पुढच्या पाच डब्यांपर्यंत पोहोचली. गाडीत प्रवाशांची फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. किंवा कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले. आगीमध्ये एकूण गार्ड ब्रेक कोच आणि चार डबे असे एकूण पाच डब्यांना आग लागल्याचे समजते. दुपारी चार वाजणेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)