Boy Dies after Fall in Manhole: अंगणात खेळता खेळता मॅनहोलमध्ये पडून एका 4 वर्षाच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना अहमदनगर शहरातील मुकुंदनगर परिसरात रविवारी 4 ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली. समर शेख असं मृत मुलाचे नाव आहे. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. समर शेख असे 4 वर्षीय मृत मुलाचे नाव आहे. मॅनहोलवर झाकण ठेवण्यात आले होते. याच झाकणावर समर शेख हा उभा होता. मात्र, झाकण कुचकामी असल्याने समर हा मॅनहोलमध्ये पडला. पाण्याचा मोठा साठा असल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. बराच वेळ होऊनही समर हा कुठे दिसत नसल्याने कुटुंबियांनी त्याची शोधाशोध घेतली. 5 तास शोध करूनही तो कुठेही दिसून आला नाही. यावेळी एका व्यक्तीने हौदात डोकावून बघितले असता, समरचा मृतदेह हौदाच्या पाण्यात तरंगताना आढळून आला. (हेही वाचा: Polar Bear Viral Video: ध्रुवीय अस्वलाचा हा मजेदार व्हिडिओ होत आहे मोठ्या प्रमाणात व्हायरल)
व्हिडीओ पहा
VIDEO | A 4-year-old boy tragically died after falling into a manhole in Ahmednagar district, Maharashtra. The incident was captured on CCTV.#Ahmednagar #Manhole #Maharashtra #CCTV #ViralVideo pic.twitter.com/PrgFK2sbeF
— TIMES NOW (@TimesNow) August 5, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, viral trends and information from social media world, including Twitter, Instagram and Youtube. The above post is embeded directly from the user's social media account and LatestLY Staff may not have modified or edited the content body. The views and facts appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY, also LatestLY does not assume any responsibility or liability for the same.)