दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीला (AAP) पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पक्षाने (BJP) 70 पैकी 48 जागा जिंकून 27 वर्षांनंतर दिल्लीच्या सत्तेत पुनरागमन केले आहे. महत्वाचे म्हणजे, अरविंद केजरीवाल स्वतः नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांच्याकडून सुमारे 4,000 मतांनी पराभूत झाले. अशात आता  सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिल्ली निवडणूक निकाल आणि अरविंद केजरीवाल यांच्या पराभवावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. दारू परवाने आणि करारांच्या मुद्द्याचा उल्लेख करून त्यांनी आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली.

अण्णा हजारे अहमदनगरमध्ये म्हणाले, ‘अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, मी एका छोट्या खोलीतच राहणार, मी बदलणार नाही. मात्र नंतर त्यांनी शिश महल बांधला. आनंद कुठे आहे हे केजरीवाल यांना समजले नाही. समाजासाठी जितके चांगले कार्य कराल, तितका जास्त आनंद आतून मिळेल. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरील समाधान हाच आमचा आनंद असला पाहिजे. ही गोष्टी केजरीवाल यांना समजली नाही.’ अहवालानुसार, हजारे म्हणाले, पूर्वी जेव्हा ते (केजरीवाल) आमच्यासोबत होते तेव्हा असे नव्हते, पण सत्तेत आल्यानंतर त्यांनी दारूचे परवाने आणि कंत्राटे देण्यास सुरुवात केली, ही त्यांची चूक होती.

Anna Hazare on Arvind Kejriwal's Defeat:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)