वाहतूकीची कायमच समस्या असलेल्या मुंबई मध्ये अंधेरीचा गोखले पूल बंद झाल्यानंतर वाहतूक कोंडी वाढली होती. मात्र आता यामधून थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या पूलाबाबत बीएमसीने शेअर केलेल्या अपडेट मध्ये 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत गोखले पुलाची एक मार्गिका खुली करणे शक्य असल्याचं म्हटलं आहे. पहिला गर्डर स्थापित करण्याचे काम आज पूर्ण झालं असून येत्या १५ दिवसात या गर्डरची तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक कामे पूर्ण होणार आहेत. असेही सांगितलं आहे. Mumbai Block: मुंबईमध्ये 27 नोव्हेंबरपासून 20 दिवसांचा ब्लॉक जाहीर; गोखले उड्डाणपुलाच्या गर्डर उभारणीसाठी Western Railway चा मोठा निर्णय .
पहा ट्वीट
🌉अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले रेल्वे उड्डाण पूल प्रकल्पातील महत्वाचा टप्पा असलेल्या पहिला गर्डर स्थापित करण्याचे काम हे काल (२ डिसेंबर २०२३) मध्यरात्रीनंतर ते आज (३ डिसेंबर २०२३) पहाटे या कालावधीत पार पडले.
🌉गर्डर स्थापन करण्याचा शुभारंभ आमदार श्री. अमीत साटम यांच्या हस्ते… pic.twitter.com/lZWsKiS123
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) December 3, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)