युवा नेते आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. सोनिया गांधी यांना उत्तम आरोग्य आणि दिर्घायू लाभो असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी ट्विटरद्वारे सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. खरे तर शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीय प्रदीर्घ काळ काँग्रेस आणि खास करुन नेहरु गांधी परिवार यांचे टीकाकार राहिले आहे. मात्र, महाविकासआघाडी स्थापन झाली आणि टीकेची ही धार काहीशी कमी झाली. पुढे महाराष्ट्रात काँग्रेससह शिवसेनेने राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापन केले आणि काँग्रेस शिवसेना स्नेह अधिक वाढला. राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन करण्यापूर्वी आदित्य ठाकरे हे स्वत: सोनिया गांधी यांना भेटले होते. त्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतत महाविकासआघाडी सरकारच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिले होते. या वेळी त्यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर हेदेखील उपस्थित होते.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)