महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आणि अभ्यासक आणि राज्यातील आंबेडकरी चळवळीतील एक सक्रिय कार्यकर्ते मनोज संसारे (Manoj Sansare) यांचं शुक्रवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. दलित पँथरचे नेते भाई संगारे यांचे निकटवर्तीय म्हणून मनोज संसारे यांची ओळख होती. एक झुंझार लढवय्या म्हणून दलित पँथरमध्ये मनोज संसारे ओळखले जायचे. संसारे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर शोककळा पसरली आहे. संसारे यांनी ‘महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्ष’ स्थापन केला होता. गेले काही दिवस ते आजारी होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)