Narali Purnima Special Recipes: नारळी पौर्णिमेचा सण उद्या आहे. नारळी पौर्णिमा हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. महाराष्ट्र आणि कोकण व्यतिरिक्त, हा सण गोवा, गुजरातच्या किनारी भागातही साजरा केला जातो, जेथे कोळी समाज नारळी पौर्णिमा हा सण उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा करतात. नारळी पौर्णिमेला कोळी बांधव वरुण देवाची पूजा करतात आणि नारळ अर्पण करतात, समुद्रात होणार्या अनुचित घटनेपासून वाचव अशी प्रार्थना करतात. नारळी पौर्णिमेला नारळापासून विशेष प्रकारचे अन्न तयार करून सेवन केले जाते. सर्वजण मिळून जेवणाचा आस्वाद घेतात. यामध्ये प्रामुख्याने नारळी भात, नारळ्याच्या वड्या, ओल्या नारळाच्या करंज्या, खोबर्याचे लाडू यांचा समावेश असतो.चला तर मग आपणही नारळापासून बनवलेल्या डिश बघूया, पाहा व्हिडीओ [ हे देखील वाचा: Raksha Bandhan Gifts Under 500: रिमोट कंट्रोलर शटर बटण ते लॅपटॉप स्टँड आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत 500 रुपयांच्या आतील हटके भेटवस्तूंची यादी, पाहा]
पाहा व्हिडीओ :
नारळाचे लाडू:
नारळ बर्फी:
नारळाचा पारंपारिक पदार्थ:
नारळाचे आप्पे:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)